१) मुलांना कोणती झाडे ओळखता आली नाही ?
उत्तर. मुलांना किंजळ, ऐनशिवण, मंदार, साग, हिरडा, बेहडा अशी झाडे ओळखता आली नाही.
२)झाडावर कोणते आंबे लोंबत होते?
उत्तर. झाडावर शेंदरी आंबे लोंबत होते.
३) ‘सुंदर घर’ या स्पर्धेत कोणाला बक्षीस मिळाले ?
उत्तर. ‘सुंदर घर’ या स्पर्धेत सहावी परीक्षेत प्रथम आलेल्या सुरभी सकपाळ हिच्या घराल्या बक्षीस मिळाले.
(आ) खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यांत लिहा.
१) लिमये आणि चोरघडे सरांना सुरभीच्या घरचा कोणता अनुभव आला ?
उत्तर. लिमये आणि चोरघडे सरांना सुरभीच्या आजीने स्वागत केले. सुरभीने त्यांना बसण्याकरिता चटई पसरली. गार पाण्याचा गडवा आणून पुढ्यात ठेवला . दारासमोर तुळशीवृंदावन होते. त्याच्या समोर छान साधीच रांगोळी घातली होती. दगडाच्या परळामध्ये पाखरांसाठी पाणी भरून ठेवले होते. त्यामुळे उन्हाळ्यातही पाखरांना व पक्ष्यांना पाणी मिळत होते. असा अनुभव किमये व चोरघडे सरांना सुरभीच्या घरी मिळाला.
२) सुरभीच्या घरी शिक्षकांनी काय पाहिले ?
उत्तर. सुरभीच्या घरी गरिबी होती. पण ती माणसे मनाने श्रीमंत होती. रघुपतींच्या घरी त्याची बायको आजारी असल्याने पोळी भाजीचा डबा सुरभीच्या घरातून पाठवला जात होता. पण त्याची प्रोढी/ वाच्यता कोणीही करत नव्हता. आजीने तांदूळ निवडून झाल्यावर तांदळाची मूठ भरून अंगणाच्या पलीकडे हिरकीवर टाकली. हे पाखरांसाठी दाणे होते. त्यानंतर सुरभीच्या आईने दोन्ही सरांना पन्हे आणून दिले व जाताना त्यांना आंब्याच्या रोवळ्या हि भेट वस्तू म्हणून दिल्या.
३) स्पर्धेचे पहिले बक्षीस सुरभीच्या घराला का मिळाले ?
उत्तर. स्पर्धेचे पहिले बक्षीस सुरभीच्या घराला मिळाले कारण इतर सर्व घरांपेक्षा सुंदर घर सुरभीचेच होते. त्या घरांत आनंद, आधार, विश्वास आणि करुणा नांदत होती. पशुंपक्ष्यांसाठी प्रेम होतं. त्या घरांत निसर्गाची जपवणूक, जतनगीरी केली जात होती. असे दृश्य अन्य घरांमध्ये पहायला मिळाले नव्हते. घराचे घरपण म्हणजे केवळ सुंदरपणा नसून त्यात प्रेम, सद्भावना असावी. पाहुण्याची उठ बस, प्राणी मात्रांवर प्रेम असावं. ह्या सर्व गोष्टी सुरभीच्या घरी होत्या त्यामुळे सुरभीच्या घराला पहिले बक्षीस मिळाले.
४) चोरघडे सरांचा स्वभाव कसा होता ?
उत्तर. गावातल्या शाळेत नुकतेच चोराघडे सर मुख्याध्यापक म्हणून आले होते. विद्यार्थी आणि शिक्षण यांमध्ये त्यांना फार रस होता . ते मनमीळावू स्वभावाचे होते. आल्या आल्या त्यांनी गावकऱ्यांना आपलेसे करून घेतले. शिक्षणाविषयी त्यांच्या काही वेगळ्या कल्पना होत्या. नाना प्रकारच्या स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या. दर पंधरा दिवसानी काही ना काही नवीन गोष्ट शोधून काढण्याची त्यांना आवड होती. त्यांना नीसर्गावर फार प्रेम होते.
५) रमाचे सुरभी बदल मत का बदल्ले ?
उत्तर. रमाने सुरभीची फजिती होण्यासाठी तिला नकळत स्पर्धेत नाव नोंदवले. पण शेवटी झालं वेगळचं. ‘सुंदर घर’ या स्पर्धेत सुरभीच्याच घराला बक्षीस मिळाले. हे पाहिल्यावर रमाला खूप वाईट वाटले. बझीस आपल्याला नाहीच आणि फजिती व्हावे म्हणून सुरभिचे नाव दिले, तर तिलाच बक्षीस ! असा विचार करुन रमाने डोक्यावर हात लावला. पण सुरभी बक्षीस देऊन आल्यावर रमाला धन्यवाद करत म्हणाली “रमा आज तुझ्यामुळे मला बक्षीस मिळाले” हे ऐकल्यावर रमा वरमली, तिचे हे साधेपणा बघुन रमाचे मन सुरभी बद्दल बदल्ले. रामाचा मनात एक विचाराचा वेगळा दिवा उजळला.
(ई) खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.
१. “आणि सर, तारीख तरी काय या स्पर्धेचा?
उत्तर. राधिकाने चोरघडे सरांना विचारले.
२. “असं सर म्हणाले का ?”
उत्तर. राधिकाने रमाला विचारले.
३. “कशाला ? घर पाहायला की काय?”
उत्तर. रमाने राधिका विचारले.
४. “वा ! विष्णू, आम्हाला खाऊ घेऊन आलास की काय?
उत्तर. चोरघडे सरांनी विष्णू्ला विचारले.
५. “तुझं नाव रमानं दिलं होतं.”
उत्तर. सबनीसबाई सुरभीला म्हणाला.
६. “अगं पाहत काय बसलीस वेंधळ्यासारखी.
उत्तर. राधिका सुरभीला म्हणाली.