अधिक प्रश्न

अधिक प्रश्न : (additional questions)

१. लेखक क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च सन्मान म्हणून कोणता पुरस्कार मिळवू शकला ?
उत्तर
–  लेखक क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च सन्मान म्हणून समजला जाणाय अर्जून पुरस्कार मिळवू शकला.

२. पुण्याच्या कोणत्या शाळेत लेखकाचे नाव घातले गेले ?
उत्तर
– पुण्याच्या ‘सावित्रीबाई फुले प्रशालेत’ आठव्या इयत्तेसाठी लेखकाचे नाव घातले गेले.

३. भारताच्या दृष्टाने खेळाचे सुवर्णपदक अतिशय प्रतिष्ठेचे का होता ?
उत्तर
– आशियाई स्पर्धेत प्रथमच कबड्डी या क्रीडाप्रकाराचा समावेश करण्यात आल्यामुळे, भारताच्या दृष्टीने खेळाचे सुवर्णपदक अतिशय प्रतिष्ठेचे होते.

(आ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत लिहा.

१. लेखकाच्या मोठ्या भावाने लेखकाला कोणता सल्ला दिला ?
उत्तर 
– ‘तुझ्याकडे कबड्डीत चमक दाखविण्यासाठी आवश्यक असणारे सर्व चापल्य आहे. मात्र तू येथे वाघोलीत न थांबता पुण्यात चल. तेथे कष्ट करून, मेहनत करून मैदान गाजविले तर तू नावही कमावशील आणि पैसाही !” असा सल्ला लेखकाच्या मोठ्या भावाने लेखकाला दिला.

२. लेखकाने दूध घालण्याचे काम स्वीकारले?
उत्तर
– शारीरिक सुदृढता  बळकट करण्यासाठी पोषक आहाराची ही आवश्यकता होती. पण मोठ्या बंधूवर खर्चाचा भार टाकायचा नव्हता, त्याला दूध घालण्याचे काम मिळाले. दुधाचे रतीब घालण्याबद्दल पैसे न घेता दररोज अर्धा लिटर दूध प्यायला द्यावे अशी मागणी मान्य झाली म्हणून लेखकाने दूद्य घालण्याचे काम स्वीकारले.

३. लेखक सकाळचा वेळ कोणत्या कामात घालवत असे?
उत्तर
– पहाटे ४ ते ६ दूध घालणे, ६ ते ८  सिंगलबार,डबलबार, जोर-बैठका, सूर्यनमस्कार असा व्यायाम, ७ ते ९  कबड्डीचा सराव, असे लेखक सकाळचा वेळ घालवत असे.

४. महिंद्र व महिंद्र बरोबरीच्या कसोटीत लेखकाच्या संद्याला कलाटणी का मिळाली ?
उत्तर
–  महिंद्र व महिंद्र बरोबरीच्या कसोटीत लेखकाचे संघ पराभवाच्या छायेत होता . संद्याचा  कर्णधार  म्हणून लेखक त्याच्या सहकाऱ्यांना थोडेसे चुचकारले. सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता त्यांच्यात आहे, याची जाणीव त्यांना करून दिली आणि लेखकाच्या संघाने उत्तरार्धांत सामन्यास कलाटणी दिली.

अधिक प्रश्न : (additional questions)

१. पाकिस्तानविरूध्द खेळळावयाचे म्हणजे भारतीय खेळाडूंचे काय व्हायचे?
उत्तर
 
– कबड्डी या आपल्या पारंपारिक खेळात भारतीय संघाचे सुवर्णपदक निश्चित असले तरी, पाकिस्तानविरुध्दच्या सामन्याबाबत लेखकाच्या संद्याच्या खेळाडूंना उगाचच दडपण वाटत होते. खेळ कोणताही असो, पाकिस्तानविरुध्द खेळावयाचे म्हणजे भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य सामना सुरू होण्यापूर्वी खचून जाते.