१) ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या अभंगात मुक्ताईने कोणता प्रयत्न केला आहे ?
उत्तर. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या अभंगात मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या मनात क्षणकाल आलेला विषण्णतेचा भाव घालवण्याचा प्रयत्न केला आहे.
२) कोणाला लोकांचे अपराध सहन करावे लागतात ?
उत्तर. जो योगी पावन (पवित्र) मनाचा आहे त्याला लोकांचे अपराध सहन करावे लागतात.
३) संत कोणाला मानावा ?
उत्तर. ज्याच्यामध्ये दया, क्षमा आहे तोच जगामध्ये संत मानावा.
ब) खालील प्रश्नांची पाच ते सहा वाक्यांत उत्तर लिहा.
१) “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या अभंगात मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना कोणता उपदेश केला आहे ?
उत्तर. “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या अभंगात मुक्ताबाईने सांगते की जो योगी पावन मनाचा आहे. त्याला लोकांचे अपराध सहन करावे लागतात. तुम्ही संत आहात, तुम्हाला कोणाचाही राग येता कामा नये. लोकांच्या शब्दशस्त्राचा त्रास झाला. तरीही, संताचा उपदेश मानून तुम्ही शांत रहावे. ज्यांच्या अंगान दया, क्षमा आहे तोच संत मनावा. लोभ, अहंकार नसणाऱ्या प्रण्याला विसक्त, ज्यांच्या मुखात शुध्द ज्ञान तोच सुखी आहे.