अधिक प्रश्न

१. कवी कोणाचा लाडका आहे ?
उत्तर. कवीच्या  देवाचा लाडका आहे .

२. कवीच्या मते जीवनाची किंमत कधी कमी होईल ?
उत्तर. कवीच्या मते जर या जगातून आपण वगळले तर जीवनाची किंमत कमी होईल.

३. कवीची दृष्टी कुठपर्यंत जाणारी आहे?
उत्तर : कवीची दृष्टी सर्व दिशांच्या आरपार जाणारी आहे.

४. कवी कशासाठी झटत आहे?
उत्तर : कवी पृथ्वीला स्वर्गासमान बनविण्यासाठी झटत आहे.

५. जीवनाची किंमत कधी कमी होईल असे कवीला वाटते?
उत्तर : कवींना जर या जगातून वगळले तर जीवनाची किंमत कमी होईल असे कवीला वाटते.

() खालील कविता ओळींचा अर्थ स्पष्ट करा:

१) कवीच्या कार्याचे महत्त्व सांगताना कवी केशवसुत काय म्हणतो ?
उत्तर.  कार्याचे महत्त्व सांगताना कवी केशवसुत म्हणतो, की “आम्हाला ‘तुम्ही कोण?’ म्हणून काय विचारता? आम्ही देवाचे लाडके आहोत. देवाने हे संपूर्ण जग आम्हाला खेळायला दिले आहे. आमच्या प्रतिभेच्या जोरावर संपूर्ण जगात आम्ही सहजपणे संचार करतो. आमची दृष्टी ही सर्व दिशांच्या आरपार पाहणारी आहे.”