१. गुरुजींचे मन स्पष्ट आहे असे कश्यावरून दिसून येते?
उत्तर. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरुन दिसते त्याप्रमाणे गुरूजींनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरूजींचे मन स्पष्ट आहे असे दिसून येते. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रातून उमटलेले आहेत.
२. गुरूजींनी शेवटच्या पत्रात काय लिहिलं होत ?
उत्तर. शेवटच्या पत्रात ‘पेरते व्हा’ असे ओरडणाऱ्या पक्ष्याचा उल्लेख केलेला होता. गुरुजींनी शेवटी सांगितले आहे की, ‘पेरते व्हा! पेरते व्हा!’ पेरा, मुबलक पेरा, सर्वत्र पेरा, निवडक पेरा, म्हणजे सगळीकडे सुगी सुगी होईल!
(आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
१. गुरुजी बालमहाराष्ट्राशी गुजगोष्टी कसे करायचे ?
उत्तर. गुरुजी उदार चरितांपैकी होते. वासरांची आठवण झाली की गाईची कास जशी तटाटू लागते, तशी मुलांची आठवण झाली, त्यांचे दर्शन झाले की गुरुजींचे मन बहरुन येई, ते तटाटू लागे. त्यामुळे दर शनिवारचे पत्र रात्री – बेरात्री , भल्या पहाटे बसून ते लिहून काढायचे. सहसा अंतराय होऊ द्यायचे नाहीत. आणि सुधाला डोळ्यासमोर ठेवून ते अवघ्या बालमहाराष्ट्राशी गुजगोष्टी करायचे.