१. लेखक बी. ए. ची परिक्षा कुठून देणार आहे ?
उत्तर – लेखक बी. ए. ची परिक्षा मार्चमध्ये अलाहाबादला जाऊन देणार आहे.
२. लेखकाच्या नाव काय आहे ?
उत्तर – लेखकाच्या वडिलांचे नाव दत्ता आहे ?
३. दत्ता बी. ए. पास होऊन किती वर्षे झाली ?
उत्तर – दत्ता बी. ए. पास होऊन वर्षे “अठरा वर्षे” झाली.
४. लेखकाचे मित्र आजीला कसे ओळखत होते ?
उत्तर – लेखकाचे मित्र किती तरी गुरुवारी घरी येऊन आजीच्या हातची भाजी खावून गेले होते म्हणून लेखकाचे मित्र आजीला ओळखत होते.
५. लेखक आजीच्या अस्थी घेऊन कुठे गेला?
उत्तर – लेखक आजीच्या अस्थी घेऊन अलाहाबादला गेला.
६. लेखकाने आजीच्या अस्थी कुठे विसर्जित केल्या ?
उत्तर – संगमावर जाऊन मावळत्या सूर्याकडे पाहत लेखकाने आजीच्या अस्थी गंगायमुनासरस्वतींच्या प्रेमसंगमात अर्पण केल्या.
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत लिहा.
१. आजीला नेण्याचा बेत कसा निश्चित झाला ?
उत्तर – लेखक कॉलेजात गेल्यावर जवळच्या मित्रांना आजीचा अलाहाबादला यायचा बेत सांगितला, त्यावर मित्र लेखकाल म्हणाले “येऊ दे आईला, आपण त्याची सोय करु. त्यात शरम वाटण्यासारखं काय आहे ? तीर्थयात्रेला आपण आपल्या वडील माणसांना नेतोच की नाही?” असे सर्वांच्या सहमतीने आजीला नेण्याचा बेत निश्चित झाला.
२. आजीला शांत करण्यासाठी लेखकाने कोणते मोघम सांगितले ?
उत्तर – भीक मागणार नाही. लाचार होणार नाही. कुणाचा मिंधा होणार नाही. उपास काढीन, पण सरळ चालेन , तुझे व्रत चालवीन असे लेखकाने मोघम लेखकाने आजीला शांत करण्यासाठी सांगितले.