खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.
१. योगी पावन मनाचा । ________________________।।१।।
२. शब्दशस्त्रे झाले क्लेश । ____________________।।३।।
३. संत तोचि जाणा जगी । _______________________।।१।।
४. लोभ अहंता न ये मना । _________________________।।२।।
५. इह परलोकी सुखी । __________________।।३।।
६. मिथ्या कल्पना ______________।
७. जीभ दातानी चाविली। _________________।।३।।
८. शुद्ध ज्याचा भाव झाला । ________________।।१।।
९. कोणी कोणास शिकवावे । ____________________।।३।।
१०. तुम्ही तरुनी विश्व तरा । ____________________।।५।।
उत्तर
१. इ) योगी पावन मनाचा । साही अपराधी जनाचा ॥१॥
२. अ) शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ॥३॥
३. इ) संत तोचि जाणा जगी । दया क्षमा ज्याचे अंगी ॥१॥
४. आ) लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तेचि जाणा ॥२॥
५. ई) इह परलोकी सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी ॥३॥
६. अ) मिथ्या कल्पना मागे सारा ।
७. इ) जीभ दातानी चाविली। कोणे बत्तीशी तोडीली ॥३॥
८. अ) शुद्ध ज्याचा भाव झाला । दूरी नाही देव त्याला ॥१॥
९. ई) कोणी कोणास शिकवावे । सार साधुनिया घ्यावे ॥३॥
१०. आ) तुम्ही तरुनी विश्व तरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥