प्रश्न:
(अ) खालील प्रश्नांची उत्तरे एकेका वाक्यात लिहा.
१. मुलगा खेळायला का जात नाही?
उत्तर – आईने अभ्यासाला बसवले होते , म्हणून मुलगा खेळायला जात नाही.
वा
उत्तर – मुलगा अभ्यासाला बसलेला असतो , त्याला खूप अभ्यास करायचा होतहानाऊन तो खेळायला जात नाही.
२. बंड्याला कोणता खेळ खेळायचा आहे?
उत्तर – बंड्याला पतंग उडवायचा खेळ खेळायचा आहे.
३. अभ्यासाच्या नावाखाली बंड्या काय करायचा ?
उत्तर – अभ्यासाच्या नावाखाली बंड्या चित्र काढत बसायचा.
४. मुलाच्या अभ्यासात कोणकोण व्यत्यय आणतात?
उत्तर – मुलाच्या अभ्यासात त्याचा मित्र बंड्या, त्याचा दादा, त्याची ताई व त्याची आई व्यत्यय आणतात.
५. आपला भाऊ ‘ ल्हान तोंडी मोठा घास ‘ घेतो असे दादाला का वाटते ?
उत्तर – मुलगा दादाला ” इंग्रजी बोलतोस अन् ते सुद्धा चुकीचं ” असे म्हणतो म्हणून दादाला वाटते की आपला भाऊ “ल्हान तोंडी मोठा घास ” घेतो.
६. दादा भावाला बहिरट का म्हणतो ?
उत्तर – भावाला बऱ्याच वेळा हाक मारल्या मुळे दादा भावाला बहिरट म्हणतो.
७. आई आपल्याला काम सांगणार हे मुलाने कसे ओळखले ?
उत्तर – आई गोड आवाजात ‘ राजा ‘ म्हणून हाक मारत होती म्हणून मुलाने ओळखले की आई आपल्याला काम सांगणार आहे.
८. दादा मुलाला कोणते काम सांगतो ?
उत्तर – दादा मुलाला सायकलमध्ये हवा भरून आणायला सांगतो.
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत लिहा.
१. मुलगा आपल्या घरच्यांची कोणकोणती कामे करतो ?
उत्तर – दादांसाठी इस्त्री करणे, बुटाला पॉलिश करणे, कपडे धुणे, खोला आवरणे, सायकल पूसणे, ताईची चिट्ठी तीच्या मैत्रिणीला पोचवणे, व आई साठी दळण आणणे, भाजी आणणे, इस्रोचे कामे कपडे आणणे, अशी घरच्यांची कामे मुलगा करतो.
२. मुलाचे दादा व ताई त्याच्याशी कसे वागतात ?
उत्तर – दादा मुलावर दादागिरी करून कामे करून घेतो तर ताई लालाच दाखवून चिट्ठी मैत्रिणीचा द्यायला सांगते. ताई नेहमी हुशारीची टेंभा दाखवते.
भाषाभ्यास:
खालील उतारा वाचा.
आवडले का तुला हे पुस्तक हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे जयंत म्हणाला वडील म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता पुढे तो मोठा ऋषी झाला कोळी होता जयंतने मध्येच विचारले हो वडील पुढे सांगू लागले फार वर्षापूर्वीची गोष्ट.
वाचलात हा उतारा ? यात जयंत व त्याचे वडील यांचा संवाद दिला आहे. हा उतातरा वाचताना वडिलांचे भाषण कोणते ? जयंतचे कोणते ? ते कोठून सुरू होते ? ते कोठे संपते ? हे काहीच समजत नाही.
मनुष्य जेव्हा बोलत असतो, तेव्हा त्याला मधून मधून थांबावेच लागते. या थांबण्याला ‘विराम’ असे म्हणतात. कोणता उद्गार कोणाचा ? त्याचे वाक्य कोठे संपते ? दुसऱ्याचे कोठून सुरु होते ? बोलणारा प्रश्न विचारतो का उद्गार काढतो ? का साधे विधान करतो ? हे केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही. बोलणाऱ्याच्या मनातला आशय पूर्णपणे कळावा; त्याच्या आवाजाच्या चढउतारावरून त्याला काय म्हणायचे आहे ते समजावे यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत यालाच विरामचिन्हे असे म्हणतात. ही विरामचिन्हे वापरल्यानंतर वरील उतारा कसा स्पष्ट होतो पाहा.
“आवडले का तुला हे पुस्तक ?
“हो! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. “जयंत म्हणाला.
वडील म्हणाले, “रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक ? रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता. पुढे तो मोठा ऋषी झाला. ”
“कोळी होता?” जयंतने मध्येच विचारले.
“हो !”वडील पुढे सांगू लागले, “फार वर्षापूर्वीची गोष्ट.”
वरील उताऱ्यात दिलेल्या काही चिन्हामुळे आपण वाचताना कोठे व किती थांबावे हे समजते व बोलणाऱ्याच्या मनातले भावही समजतात. त्यामुळे उतारा सहज समजण्यास मदत होते.
आपल्या लेखनात वारंवार येणारी प्रमुख विरामचिन्हे कोणती व ती केव्हा वापरतात हे थोडक्यात पुढील तक्त्याच्या स्वरूपात दिले आहे. त्याचा नीट अभ्यास करा,
क्र. चिन्हाचे नाव | चिन्ह केव्हा वापरतात | उदाहरण |
१. पूर्णविराम | १. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखविण्यासाठी | १) तो घरी गेला.
२) ता. क. ( ताजा कलम) वि. वा. (विनायक वामन) |
२. अर्धविराम ; | दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात | गडगडाट झाला, पण पाऊस पडला नाही. |
३. स्वल्पविराम, | १. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास.
२. संबोधन दर्शविताना |
माझा भाऊ धाडसी, तरूण, हुशार खेळकर आहे
गीता, तू घरी जा. |
४. प्रश्नचिन्ह ? | प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी | तू कुठे होतीस? |
५. अपूर्णविराम : | वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा खालील असल्यास | विद्यार्थी वर्गात हजर होते: गीता, समीर, शशांक |
६. उद्गारचिन्ह ! | उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी | १. शी ! किती घाण आहे इथे !
२. अरेच्या ! तू ह्यावेळी इथेकसा ? |
७. अवतरण चिन्हे | (दुहेरी ) बोलणाऱ्याच्या तोंडचे दाखविताना (एकेरी)एखाद्या शब्दावर जोर द्यायचा | आई म्हणाली, ” हे पेढे वाट.” |
८. संयोगचिन्ह | १. दोन शब्द जोडताना प्रेम-विवाह, विद्यार्थी – भांडार
२. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास |
आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटां-गणावर होईल. |
९. अपसार (डॅश)
(स्पष्टीकरण चिन्ह)। |
१. बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास
२. स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास |
१. मी तेथे गेलो पण -२. तो मुलगा -ज्याने बक्षीस मिळालेलेआपल्या शाळेत आहे. |
योग्य विरामचिन्हे घालून खालील उतारा पुन्हा लिहून दाखवा.
बाळू म्हणाला ऐका मित्रहो तुम्ही उगाच घाबरलात तसे पळून जायच काहीही कारण नव्हतं मी ही घाबरलो तसे का बाबांनो इतकं घाबरवलं आपल्याला जाऊ द्या म्हणा येत्या रविवारी तुम्ही नाटक पाहायला यायचं बरं का ऐका ऐका ऐका ऐतिहासिक विनोदी नाटक सिंहगडावर स्वारी
उत्तर
बाळू म्हाणाला, ऐका ! मित्रहो, ” तुम्ही उगाच घाबरलात. तसे पळून जायचं काहीही कारण नव्हतं.” मी ही घाबरलो- तसे का? बाबांनो इतकं घाबरवलं आपल्याला. जाऊ द्या म्हणा. येत्या रविवारी तुम्ही नाटक पाहायला जायचं, बरं का! एका! ऐका! ऐका! ऐतिहासिक विनोदी नाटक – ‘सिंहगडावर स्वारी.
‘