१. ध्यान करणाऱ्या कीटकाला कोणाचा वर्ण (वंश) प्राप्त होतो ?
उत्तर. ध्यान करणाऱ्या कीटकाला शिवभक्ताचा (शवगणाचा) वर्ण (वंश) प्राप्त होतो.
२. परिसच्या सहवासाने काय होते ?
उत्तर. परिसच्या सहवासाने लोखंडाचे सोने होते.
३. खरा वर्ण कोण ठरतो ?
उत्तर. शिवभक्त हाच पुढे खरा वर्ण ठरतो.
४. कोणाच्या संगतीत वनस्पती सुगंधी (परिमळू) बनतात ?
उत्तर. चंदनाच्या संगतीत वनस्पती सुगंधी (परिमळू) बनतात.
ई) खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा.
१. कीर्तनामध्ये रंगल्याने मिळालेल्या आनंदाचे वर्णन नामदेवांनी कसे केले आहे ?
उत्तर. कीर्तनामध्ये तल्लीन होऊन नाचल्यामुळे नामदेव चराचर सुष्टीला विसरून गेले. अवघी सुष्टी विठ्ठलरखुमाई बनून आपल्याजवळ नाचात असल्याच्या आभासाने त्यांचे चित्त प्रफुल्लित झाले आहे. लौकिकाच्या पलीकडे असलेला मोक्ष हेच माझे घर आहे. भक्तिमार्गानेच मी तेथे पोचू शकेन. विठ्ठल- रखुमाई माझ्या परमसंतोषाचा स्त्रोत आहे. आपण सारे तेथे निरंतर राहूया. सर्वांचे मूळ वसतिस्थान तेच तर माझे पूर्ण रुप आहे. लौकिकाच्या पलीकडची सारी सत्ता माझ्या हाती आल्याचे सुख कीर्तनाच्या रंगात नाचत असताना लाभते. ते सुख मजबरोबर तुम्हालाही लाभेल. माझ्या गुरूच्या – विसाबो खेचरांच्या दातृत्वामुळेच मला हे परमसुख, अवर्णनीय आनंद प्राप्त झालेला आहे.
२. संतांच्या सहवासात असलेल्या भक्तांत घडून बदल नामदेवांनी कोणत्या उदाहरणांतून स्पष्ट केले आहे ?
उत्तर. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊन जाते. सामान्य कीटक परमेश्वराचे ध्यान करू लागला तर तोही शिवदास होऊन जातो. परमेश्र्वराचा परम भक्त बनून जातो. कोणताही वनस्पती चंदनाच्या सान्निध्यात चंदनाचा सुगंध (परिमळू) प्राप्त करू शकते. वृत्तिप्रवृत्ती वेगळी असली तरी सत्संगतीचा परिणाम चांगलाच होतो. या तीन उदाहरणांतून नामदेवांनी संतांच्या सहवासात असलेल्या भक्तांना परमेश्वराची भेट होते व ते संतपदास पोचतात हे स्पष्ट केले आहे.
३. संताचा सहवासात परमेश्वर कसा भेटतो ?
उत्तर. परिसाच्या सहवासाने, स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तसा संतांच्या सहवासात परमेश्वर भेटतो.आपण परमेश्वरच बनून जातो. साधा कीटक तो काय? पण तोसुद्धा ध्यान क शिवगण (देवाचा भक्त) बनून जातो (जसा नराचा नारायण). शिवभक्त हाच त्याचा पुढे का वर्ण ठरतो कारण तो शिवमय बनलेला असतो. तसा संतांच्या संगतीत राहिल्यावर परमेश्वर भेटतो. सर्वच वनस्पती सुगंधी नसतात. पण चंदनाच्या सहवासात राहणाऱ्या वनस्पती चंदनच बनून जातात. चंदनाचा सुवास त्यांना प्राप्त होतो. चंदनाची गुणज्ञता काही प्रमाणात का होईना ती जवळच्या वनस्पतीना प्राप्त होते.