MULTIPLE CHOICE QUESTIONS

खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.

१. कोणकोणती कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी _____________________.

अ) वहीवर लिहून ठेवलं.
आ) उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या.
इ) बायकोला सांगून ठेवलं.
ई) पदराला गाठी मारून ठेवल्या.

२.  मला स्मरणशक्ती द्यायला ________________.

अ) परमेश्र्वर अजिबात विसरला की काय ? 
आ) देव अजिबात विसरला की काय ?
इ) महादेव अजिबात विसरला की काय?   
 ई)  ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय?

३. हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोंनी माझ्या _________________.

अ) सत्यानाश केला आहे.
आ) जन्माचे इथेच सार्थक झाले आहे.
इ) जन्माची वाट लावली.
ई) जन्माचे इथेच समाधान झाले आहे.

४. तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिली नसतीस तर खात्रीने मी  __________________.

अ) नावसुद्धा विसरलो असतो. 
आ) स्वतःलासुद्धा विसरलो असतो.
इ) तुलासुद्धा विसरलो असतो. 
ई) माझे नावसुद्धा विसरलो असतो.

५. आठवण राहत नाही तर  ___________________.

अ) लिहून ठेवाव लागत.    
आ) पदराला खूणगाठ बांधावी एखादी.
इ) सांगून ठेवाव लागत.
ई) उपरण्याला खूणगाठ बांधावी एखादी.

६. माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली _______________.

अ) इज्जत ठिकाणावर आहे. 
आ) अब्रू ठिकाणावर आहे.
इ) इज्जत ठिकाणावर नाही आहे.  
 ई)  अब्रू ठिकाणावर नाही आहे.

७. वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे ________________.

अ) ते आणलं. 
आ) ते सांगितलं.
इ) ते विसरलो!
ई) ते मागितलं.

८. हे पहा, तुम्हांला जर माझा छळ करायचा असेल तर ___________________.

अ) मी जाते आपल्या घरी. 
आ) मी एकून नाही घेणार.
इ) मी जाईन घर सोडून. 
ई) मी जाते आपली माहेरी.

९. माझ्या बापाच्या येथे _________________.

a)अ) अन्नवस्त्राला काही तोटा नाही. 
आ) खायला काही तोटा नाही.
इ) अन्नाचा काही तोटा नाही. 
ई) कपडाला काही तोटा नाही.

१०. त्याच्या खाणावळीत रोज _____________.

अ) तीनशी पान जेवून जातात.
आ) लोक जेवून जातात.
इ) दोनशे पान जेवून उठते.
ई) गर्दी असते.


११. आई खंबीर आहे मला ________________.

अ) पोसायला!
आ) पाळायला!
इ) ठेवायला! 
 ई) वाढवायला!

१२. म्हशीची शिंगे म्हशीला काही ______________.

अ) मारत नाहीत! 
आ) जड होत नाहीत!
इ) त्रास देत नाहीत!
ई) जड नाही होत!

                                                                       
१३. त्याने केला दिवाळसण, पण ______________.

आ) माझी झाली दिवाळी!
इ) माझी लागली वाट! 
ई) माझे निघाले दिवाळे!

१४. इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खाणावळीत; पण ______________.

अ) माझ्याखेरीज पान हालत.
आ) माझ्या शिवाय काय होत नाही
इ)  माझ्याखेरीज पान हालत नाही. 
ई) माझ्या शिवाय काही होणार नाही.

१५. खाणावळीतली दोनदोनशे पाने हालवायला __________________.

अ)  तुझ्यासारखी धाडसी बाई पाहिजे. 
आ) तुझ्यासारखा खंबीर नवराच पाहिजे.
इ) तुझ्यासारखा कामगार पाहिजे.   
  ई)  तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे.

उत्तर

१. आ) कोणकोणती कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या.

२. ई) मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय?

३. आ) हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोंनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे.

४. अ) तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिली नसतीस तर खात्रीने मी नावसुद्धा विसरलो असतो.

५. ई) आठवण राहत नाही तर उपरण्याला खूणगाठ बांधावी एखादी.

६. अ) माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली अब्रू ठिकाणावर आहे.

७. इ) वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे ते विसरलो.

८. ई) हे पहा, तुम्हांला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी.

९. अ) माझ्या बापाच्या येथे अन्नवस्त्राला काही तोटा नाही.

१०. इ) त्याच्या खाणावळीत रोज दोनशे पान जेवून उठते.

११. अ) आई खंबीर आहे मला पोसायला!

१२. आ) म्हशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत!

१३. ई) त्याने केला दिवाळसण, पण माझे निघाले दिवाळे!

१४. इ) इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खाणावळीत; पण माझ्याखेरीज पान हालत नाही.

१५. ई) खाणावळीतली दोनदोनशे पाने हालवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे.