MULTIPLE CHOICE QUESTIONS

 खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.

१. नाचूं कीर्तनाचे रंगी ।  ____________ ।।१।।

अ) ज्ञानज्योती लावू जगी ।।१।।
आ) ज्ञानदीप लावू जगी ।।१।।
इ) दीप लावू जगी ।।१।।
ई) वृक्ष लावू जगी ।।१।।

२. सर्व सांडूनी माझाई। ______________.

अ) वाचे विठ्ठल रखुमाई ।।२।।
आ) वाचे लक्ष्मी नारायण ।।२।।
इ) वाचे रखुमाई विठ्ठल ।।२।।
ई) वाचे गोविंद गोपाळ ।।२।।

३. परेहून परते घर। _________________.

अ) तेथे राहु रोज ।।३।।
आ) ज्ञानदीप लावू रोज ।।३।।
इ) तेचि माझे रूप पूर्ण ।।३।।
ई) तेथे राहु निरंतर ।।३।।

४. सर्वांचे जे अधिष्ठान । ________________.

अ) तेथे राहू निरंतर ।।४।।
आ) तेथे माझ्या गाव ।।४।।
इ) तेचि माझे रूप पूर्ण ।।४।।
ई) तेचि तुझे रूप पूर्ण ।।४।।

५. परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण । _____________________.

अ)  तैसा भेटे गोविंद संतसंगे ।।१।।
 आ) तैसा भेटे विठ्ठल संतसंगे ।।१।।
इ) तैसा भेटे गोविंद गोपाळ संतसंगे ।।१।।
  ई) तैसा भेटे नारायण संतसंगे ।।१।।

६. कीटकी ध्याता भृंगी झाला ________________।

अ) तेचि वर्ण ।
आ) तेचि ज्ञान ।
इ) तेचि ध्यान ‌।
ई) तेचि वंश।

७. वनस्पति परिमळू _______________ ।

अ) लोह होय सुवर्ण ।
आ) भृंगी झाला तोचि वर्ण।
इ) पसरी चोहीकडे ।
ई) चंदन झाला जाण ।

उत्तर
१. आ) नाचूं कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।। १।।

२. अ) सर्व सांडूनी माझाई। वाचे विठ्ठल रखुमाई ।।२।।

३. ई) परेहून परते घर। तेथे राहु निरंतर ।।३।।

४. इ) सर्वांचे जे अधिष्ठान । तेचि माझे रूप पूर्ण ।।४।।

५. ई)  परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगे ।।१।।

६. अ) कीटकी ध्याता भृंगी झाला तेचि वर्ण

७. ई) वनस्पति परिमळू चंदन झाला जाण