१) ‘मन करा रे प्रसन्न’ या अभंगात संत तुकाराम महाराजांनी
कोणती शिकवण दिली आहे ?
उत्तर. ‘मन करा रे प्रसन्न’ या अभंगात संत तुकाराम महाराजांनी मनाची थोरवी सांगून, त्यातून परमार्थाची शिकवण दिली आहे.
२) माणूस दुर्बल कसा बनतो ?
उत्तर. कोणत्याही गोष्टीचा ताण मनावर आला की माणूस दुर्बल बनतो.
३) तुकाराम महाराजांचे ४१ वर्षांचे उणेपुरे आयुष्य कोठे गेले ?
उत्तर. तुकाराम महाराजांचे ४१ वर्षांचे उणेपुरे आयुष्य पुण्याजवळच्या देहू गावात गेले.
४) तुकाराम महाराज कोणाचे परम भक्त होते ?
उत्तर. तुकाराम महाराज पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते.
(इ) खालील प्रश्नांची पाच ते सहा वाक्यांत उत्तर लिहा.
१) या अभंगातून तुकाराम महारजांनी परमार्थाची शिकवण कशी दिली आहे ?
उत्तर. माणसाला परमार्थाकडे किंवा प्रपंचाकडे जायला उद्युक्त करते ते त्याचे मन. प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो. आपण आपले मन काबूत ठेवले तर अष्टसिध्दींवरही अधिकार मिळवू शकतो. प्रपंच नीट करूनही शेवटी मानवी जीवनाच्या बंधनातून मुक्ती मिळू शकते. आपले पूर्ण मन परमश्वरचरणी वाहिले तरच आपल्या मनात त्याची प्रतिमा अढळ राहते. त्याची पूजा मन नि:स्वार्थभावे करू लागते. परमेश्वरदर्शनासाठी दूर कोठे जाण्याची गरज नाही. मनाचे स्वरूप कसेही असो; ते खऱ्या भक्तासाठी आईचे असते. आईचे वात्सल्य, गुरूचा उपदेश व ज्ञान, शिष्याची नम्रता आपल्याठायी एकवटली की परमार्थाकडे जाणारी वाट सोपी बनते. म्हणून साथक, वाचक, विद्वान, श्रोते, वक्ते यांनी परमार्थ साधण्यासाठी मन प्रसन्न ठेवले पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरे दैवत नाही.
२. या अभंगात तुकाराम महाराजांनी मना बदल काय सांगितले आहे ?
उत्तर. या अभंगात तुकाराम महाराजांनी मना बदल सांगितले आहे की मन माणसाचा सर्व सिद्धीचे कारण असते. मग तो मोक्ष असो वा बंधन, सुख असो वा समाधान. आपण प्रसन्नतेने आपल्या मनात सत्कार्याची प्रतिमा स्थापन केली पाहिजे. मनापासून आपल्या मनाची पूजा केली तर मनाने तुमची इच्छा पूर्ण केलीच म्हणून समजा. मन ही सर्वाची माऊली आहे. मन हेच आपला गुरू आणि शिष्य असते. मन आनंदाने आपली गुलामगिरी पत्करते. प्रगती असो, अधोगती असो- मन प्रत्येकाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करते. आपणही अधोगतीचे दुःख न मानता प्रसन्न चित्त (मन) ठेवले पाहिजे. माणसाचा विकास, व्यक्तिमत्व विकास सुदृढ मनावर अवलंबून असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मनासारखे दुसरे दैवत नाही.