खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.
१. लिडर नदीवरचा पूल पार करीत आमची गाडी_______________________.
२. निसर्गसौंदर्यानं विनटलेलं हे _________________________.
३. लॉजवर वॉश घेऊन लगेच आम्ही ______________________________.
४. समोरच्या रस्त्यालगत बऱ्याच कश्मिरी मुली बदाम, अक्रोड _________________________.
५. दूरवर एक छोटीशी मुलगी मात्र ____________________________.
६. कश्मिरी वेषात ती एखाद्या___________________________.
७. ते पाहून तिला ________________________________.
८. रस्त्याला लागूनच नदीकाठी __________________________.
९. दारांतच एक जिवंत___________________________.
१०. आता इथं वाघ राहिले नाहीत, _________________________.
११. सासूबाईंना हाताला धरून _______________________________.
१२. तिच्या बोलण्यावरून इथल्या ___________________________.
१३. इतकी निसर्गाची श्रीमंती असलेल्या प्रदेशात ______________________________.
१४. पश्चिमेच्या पहाडांपलीकडे ___________________________.
१५. लॉजसमोरच्या दुकानांच्या मोकळ्या जागेत शेकोटी पेटवून अनेक ग्रामवासी आपापले ___________________.
१६. सासूबाई आणि समीर तर उबदार लॅकेटांमध्ये केव्हाच _____________________.
१७. शाल तशीच घट्ट पांघरून ________________________________.
१८. पेहलगामपासून तेरा किलोमीटर म्हणजे _____________________________.
१९. इथूनच पुढं _________________________.
२०. पेहलगाम तसं एक दिवसांत पाहून समाधान होण्यासारखे नव्हतंच तरीही__________________________.
उत्तर
१. इ) लिडर नदीवरचा पूल पार करीत आमची गाडी पेहलगामच्या बस अङ्ग्गावर येऊन थांबली.
२. अ) निसर्गसौंदर्यानं विनटलेलं हे अत्यंत सुंदर गांव.
३. आ) लॉजवर वॉश घेऊन लगेच आम्ही भटकायला बाहेर पडलो.
४. इ) समोरच्या रस्त्यालगत बऱ्याच कश्मिरी मुली बदाम, अक्रोड विकायला घेऊन बसल्या होत्या.
५. ई) दूरवर एक छोटीशी मुलगी मात्र स्तब्ध बसली होती.
६. अ) कश्मिरी वेषात ती एखाद्या परीसारखी दिसत होती.
७. आ) ते पाहून तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला.
८. ई) रस्त्याला लागूनच नदीकाठी गौरीशंकर मंदिर होतं
९. इ) दारांतच एक जिवंत झरा झुळझुळत होता.
१०. इ) आता इथं वाघ राहिलेनाहीत, व्याघ्र पर्वत हे नाव राहिलं.
११. आ) सासूबाईंना हाताला धरून डोंगर चढण्यास मदत करीत होती.
१२. ई) तिच्या बोलण्यावरून इथल्या गरीबीचा अंदाज येत होता.
१३. आ) इतकी निसर्गाची श्रीमंती असलेल्या प्रदेशात एवढे प्रचंड दारित्र्य असावं.
१४. अ) पश्चिमेच्या पहाडांपलीकडे तांबूस उधळण होऊ लागली.
१५. आ) लॉजसमोरच्या दुकानांच्या मोकळ्या जागेत शेकोटी पेटवून अनेक ग्रामवासी आपापले साज घेऊन तल्लीनतेनं गीत म्हणत होते.
१६. ई) सासूबाई आणि समीर तर उबदार लॅकेटांमध्ये केव्हाच गाढ झोपी गेले होते.
१७. आ) शाल तशीच घट्ट पांघरून मी खिडकीजवळ आले.
१८. इ) पेहलगामपासून तेरा किलोमीटर म्हणजे ‘चंदनवाडी’ पर्यंत घोड्यावरून रपेट केली.
१९. अ) इथूनच पुढं ‘अमरनाथ’ च्या यात्रेला जावं लागतं.
२०. ई) पेहलगाम तसं एक दिवसांत पाहून समाधान होण्यासारखे नव्हतंच तरीही पुढचा सारा कार्यक्रम आम्हाला खेचीत होता.