१. लोहिया कुठे येऊन राहिले होते ?
उत्तर – लोहिया मडगावच्या स्टेशन रोडवरील रिपब्लिक हॉटेलमध्ये गुपचूपपणे येऊन राहिले होते.
२. घोड्याच्या गाडीत कोण कोण बसले ?
उत्तर – घोड्याच्या गाडीत डॉ. राममनोहर लोहिया, डॉ. ज्युलियाव मिनेझिस व लक्ष्मीदास बोरकर बसले.
३. लोहियांचे भाषण कोणी वाचले ?
उत्तर – लोहियांचे भाषणाचे कागद घऊन विश्वनाथ लवंदे यांनी भाषण मोठमोठ्याने वाचले.
४. देशभक्तांना पकडल्यावर कोणी धैर्य दाखविले ?
उत्तर – देशभक्तांना पकडल्यावर मडगावच्या हिंदू महिलांनी अनपेक्षितपणे मोठेच धैर्य दाखविले.
५. लोकांना शांत करण्यासाठी पोलीसांनी काय केले ?
उत्तर – लोकांना शांत करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने डॉ. लोहियांना विनंति केली की त्यानी चार शब्द बोलून लोकांना शांत करावे.
(आ) पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन वा तीन वाक्यांत लिहा.
१. लोहियांच्या कोणत्या निर्भय कृतीने जमलेल्या लोकांना सामर्थ्य दिले ?
उत्तर – संधी साधून लोहियांनी भाषणास सुरूवात केली तेव्हा कॅप्टन मिरांदाने त्यांच्यावर पिस्तूल रोखले आणि हुकुम केला, “भाषण बंद कर, नाहीतर मी गोळी झाडीन” पण धीरोदात्तपणे लोहिया बोलत राहिले आणि बोलत असतानाच त्यांनी, अंगावरील माती झटकावी त्याप्रमाणे कॅप्टन मिरांदाचा पिस्तुलधारी हात लोहियांनी डाव्या हाताने बाजूला सारला. लोहियांच्या या निर्भय कृतीने जमलेल्या लोकांना सामर्थ्य दिले, त्यांचे नैतिक बल वाढविले.
२. ‘मी भाषण करायला आलो आहे’ या डॉ. लोहियांच्या वाक्यावर कॅ. मिरंद काय म्हणाला ?
उत्तर – कॅ. मिरंद मडगाव शहराचाच नव्हे तर सासष्टी तालुक्याचा ॲडमिनिस्ट्रेटर होता. त्याने डॉ. लोहीयांना खडसावण्याच्या सुरात विचारले, ‘ तू येथे का आलास ?’ डॉ. लोहियांनी उत्तर दिले, ‘मी भाषण करायला आलो आहे.’ यावर कॅ. मिरंद म्हणाला, ‘ गोव्यात तसे भाषण करता येत नाही. पूर्वपरवानंगी लागते. त्यासाठी अर्ज करावयाचा असतो. अर्जात भाषणाचा विषय लिहायचा असतो.’
३. मडगावच्या महिलांनी कशाप्रकारे धैर्य दाखवले ?
उत्तर – मडगावच्या हिंदू माहिलांनी अनपेक्षितपणे मोठेच धैर्य दाखवले. साठ स्त्रियांचा मोर्चा पोलीसठाण्यावर गेला. सगळ्या स्त्रिया कुलीन घरण्यांतील होत्या. ‘कुमारी कीर्तनीला सोडा नाही तर आम्हांलाही पकडा’ असा हट्ट त्यांनी धरला. त्या काळात हिंदू स्त्रिया रस्त्यातून एकट्या फिरत नसत. पण त्यांच्या ह्दयांत देशभक्तीचा अंगार पेटत होता. त्या दिवशी त्या निर्भय झाल्या.
४. पोलीस अधिकाऱ्याने वत्सला कीर्तनीला को सोडले?
उत्तर – ‘कुमारी कीर्तनीला सोडा नाही तर आम्हांलाही पकडा’ असा हट्ट मडगावच्या हिंदू महिलांनी धरला. त्या काळात हिंदू स्त्रिया रस्त्यातून एकट्या फिरत नसत. पण त्यांचा हृद्यांत देशभक्तीचा अंगार पेटत होता. त्या दिवशी त्या निर्भय झाल्या. त्यांची तेजस्विता पाहून पोर्तुगीज पोलीस गडबडले. नागरिक आश्चर्यचकित झाले. चौकीच्या बाहेर त्यांचा जमाव जमला, वाढू लागला. म्हणून पोलीस अधिकाऱ्याने वत्सला कीर्तनीला सोडून दिले.
५. गोमंतकीय जनतेने कशा तऱ्हेने आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे उद्घाटन केले ?
उत्तर – देशभक्तांची धरपकड झाल्यावर लोकांनी प्रचंड मिरवणूक काढली आणि एका वेगळया ठिकाणी सभा भरविली. सभेत पुरूषोत्तम काकोडकर व आणखी काही कार्यकर्त्यांनी भाषणे करून लोकांना अटक केल्या बद्दल सरकारने निषेध केला आणि नागरी स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. गोमंतकीय जनतेने अशा तऱ्हने आपल्या स्वातंत्रलढ्याचे उद्धघाटन केले.
(इ) पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येक पाच ते सहा वाक्यांत लिहा.
१. सरकाने लोहियांता अटक करण्याची तयारी, कशी केली होती ?
उत्तर – लोकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले तर हुकुमशाही राजवट पत्यांच्या इमारतासारखी चटकन् कोसळते. म्हणूनच लोहियांना भाषणबंदीचा कायदा मोडण्याची मोकळीक देऊ नये, कायदा मोडण्याच्या आधीच त्यांना अटक करावी असा सरकारचा हुकुम पोलिसांना देण्यात आला होता. त्यानुसार सर्व रस्त्यांच्या नाक्यांवर सरास्त्र पोलीस पहारा करत होते, बंदुकधारी पोलीस शहरात गस्त घालत होते; पोलीस गाड्या फिरत होत्या आणि सर्व टॅक्सीवाल्यांना गुप्त फर्मान काढण्यात आले होते की शहरात फिरणाऱ्या टॅक्सीने पॅसेंजरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोचविण्यापूर्वी पोलीस चौकीवर प्रथम हजर केले पाहिजे. लोहिया टॅक्सीतून सभास्थानी यायला निघतील आणि मग ते सरळ आपल्या सापळ्यात सापडतील असा पोलीस अधिकाऱ्यांना समज होता.
२. लोहियांना सभास्थानी आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणती व्यूहरचना केली होती ?
उत्तर – रिपब्लिक हॉटेलमधून लोहियांना सभास्थानी आणण्याचे मेहत्वाचे काम लक्ष्मीदास बोरकर या तरुणाकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी एक घोड्याची गाडी मिळविली. पाऊस पडत होता ते निमित्त साधून त्यांनी गाडी बंद करून घेतली. त्या गाडीत डॉ. राममनोहर लोहिया, डॉ ज्युलियाव मिनेझिस व लक्ष्मीदास बोरकर चटकन् बसले. घोडा ऐटीत दुडकी चालीने गाडी घेऊन निघाला. गाडी कोर्टापुढे गेली. चर्चचा आवार आणि पेट्रोल पंप यांच्या मध्ये गाडी उभी करण्यात आली नियोजित सभास्थान सुमारे पंचवीस फूट अंतरावर होते. अशाप्रकारे डॉ लोहियांना सभास्थानी पोहोचवण्यात आले.
३. १८ जून १९४६ या दिवशी मडगावात देशभक्तांची कशा प्रकारे धरपकड झाली ?
उत्तर – कॅ. मिरांदने डॉ. लोहिया व डॉ. मिनझिन दोघांनाही अटक केले व त्यांना गाडीत बसवून तो त्यांना घेऊन जवळच असलेल्या चौकीवर गेला. लोहियांचे भाषणाचे कागद घेऊन लवंदे लोहियांचे भाषण मोठमोठ्याने वाचू लागला. कॅ. मिरांद तिथे येऊन लवंदेच्या पाठीवर, पायावर चारपाच रट्टे सपासप मारले, भाषणाचे कागद हिसकावून घेतले आणि त्याला पोलीस व्हॅनमध्ये घालून जवळच्या चौकीवर नेले. पण लोकांचा कैफ कमी झाला नाही. लवंदेच्या जागी दुसरे सत्याग्रही एकेक करून उभे राहिले आणि भाषण देऊ लागले. लोक जयजयकार करत राहिले . त्या संध्याकाळी लक्ष्मीदास बोरकर , डॉ. विनायक मयेकर, व्यंकटेश वेरेकर, त्रिविक्रम विष्णू वैद्य, निळकंठ करापुरकर, कुमारी वत्सला कीर्तनी, इव्हाग्रियु जॉर्ज यानाही पकडण्यात आले. अशाप्रकारे १८ जुने १९४६, या दिवशी मडगावात सुमारे दीडशे देशभक्तांची धरपकड झाली.