(अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
१. तिरूवल्लुवर कुठल्या गावचा होत ?
या
तिरूवल्लुवर कुठे राहत होता ?
उत्तर. तिरूवल्लुवर तामिळनाडूमधील एका गावात राहत होता.
२. सावकाराचा मुलगा कुणालाच का घाबरत नसे ?
उत्तर. पैशांची मस्ती आणि तारूण्याची रग यामुळे सावकाराचा मुलगा कुणालाच घाबरत नसे.
३. तिरूवल्लुवरच्या एक कपड्याची किंमत क्या होती ?
उत्तर. तिरूवल्लुवरच्या एक कपड्याची किंमत दोन रुपये होती.
४. ‘संत तिरूवल्लुवर’ हा पाठ कुणी लिहिला ?
उत्तर. ‘संत तिरुवल्लुवर’ हा पाठ चंद्रकांत गांवस यांनी लिहिले.
५. तिरूवल्लुवरने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?
उत्तर. तिरुवल्लुवरने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव ‘तिरूक्कुरल’ आहे.
६. तिरुवल्लुवरला जाऊन किती वर्षे झाली ?
उत्तर. तिरुवल्लुवरला जाऊन आज हजारो वर्ष झाली.
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यांत लिहा.
१. तिरूवल्लुवरचे पाय धरल्यावर सावकाराच्या मुलाला तिरूवल्लुवरने काय समजावले ?
उत्तर. आपली चूक मानून तिरूवल्लुवरचे पाय धरल्यावर सावकाराच्या मुलाला तिरूवल्लुवर समजावत म्हणाला “माणसाने प्राणपणाने सांभाळावी अशी एकच वस्तू देवाने माणसाला दिली आहे. ती म्हणजे सदाचार. त्याची साथ माणसाने कधी सोडू नये.”
२. बाजारत लोकांची बरीच गर्दी का होती ?
उत्तर. आठवड्याचा बाजार असल्याने बाजारात लोकांची बरीच गर्दी होती. कोणी काही विकण्यासाठी आला होता तर कोणी काही विकत घेण्यासाठी आला होता. तसेच तिकडे तरुणांची एक घोळके मात्र उगीचच बाजारात फिरत होते.
३. सावकार का प्रभावित झाला ?
उत्तर. ज्याने माझ्या मुलाला सुधारले त्या देवमाणसाचे आभार मानले पाहिजेत असे सावकाराला वाटले, म्हणून एक दिवस सावकार तिरूवल्लुवरला भेटण्यासाठी मुलाला घेऊन त्याच्या घरी गेला. हातामागावर कापड विणत तिरूवल्लुवर गोड आवाजात ओव्या म्हणत होता. त्याचा ओव्या ऐकून सावकार प्रभावित झाला.
४. कविपरिषद कशाप्रकारे मांडली जायची ?
उत्तर. कविपरिषद पांड्या राजे भरवत असत. तेथे कवी आपापले काव्यसंग्रह वाचत. कविपरिषदेतील पंडित काव्यग्रंथाचा कस ठरवीत; त्याप्रमाणे राजा कवीचा यथायोग्य सन्मान करी. अशाप्रकारे कविपरिषद मांडली जायची.
५. तिरूवल्लुवरचा ग्रंथ कोण कोणत्या भाषांत भाषांतर झाला आहेत?
उत्तर. तिरूवल्लुवरचा ग्रंथ संस्कृत, तेलगू, मल्याळी, मराठी, उर्दू इत्यादी भारतीय भाषांत आणि इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन , सिंहली आदी विदेशी भाषांत भाषांतर झाला आहेत.