खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.
१. तामिळनाडूमधील एका गावात तिरूवल्लुवर नावाचा____________________.
२. घरी कापड विणायचे व आठवड्याच्या बाजारात विकायचे असा त्याचा ______________.
३. बाजारात कपडे, खेळणी, खाण्याचे पदार्थ_________________.
४. बाजारात लोकांची बरीच _________________.
५. काही विकण्यासाठी आला होता तर कोणी काही _________________.
६. पण तरुणांचे एक घोळके मात्र उगीचच__________________.
७. त्यांच्यामध्ये सावकाराचाही_________________.
८. फिरत फिरत ते टोळके__________________.
९. तुझ्यात हिंमत असेल तर त्याला ___________________.
१०. त्याच्या आवाजात किंचितही _________________.
११. क्रोध, अहंकार यासारखे वाईट गुण माणसाचे _____________________.
१२. त्याच्या आवाजात _______________.
१३. माणसाने प्राणपणाने सांभाळावी अशी एकच वस्तू______________.
१४. आपला मुलगा सुधारला म्हणून_____________________.
१५. त्याच्या ओव्या ऐकून____________.
१६. त्या ओव्या ऐकून सावकाराला वाटले की, तिरूवल्लुवरच्या_______________.
१७. म्हणून सावकार तिरूवल्लुवरला घेऊन ______________.
१८. एकेका कवीने आपापला ____________________.
१९. खरोखरच हा जीवनाचा ________________________.
२०. त्यांनी ज्या छंदात ओव्या लिहिल्या त्याला_________________.
२१. तिरूवल्लुवरला जाऊन आज _______________.
उत्तर
१. आ) तामिळनाडूमधील एका गावात तिरूवल्लुवर नावाचा एक माणूस राहत होता.
२. इ) घरी कापड विणायचे व आठवड्याच्या बाजारात विकायचे असा त्याचा व्यवसाय होता.
३. ई) बाजारात कपडे, खेळणी, खाण्याचे पदार्थ विकण्यासाठी आणले होते.
४.अ) बाजारात लोकांची बरीच गर्दी होती.
५. इ) काही विकण्यासाठी आला होता तर कोणी काही विकत घेण्यासाठी आला होता.
६. ई) पण तरुणांचे एक घोळके मात्र उगीचच बाजारात फिरत होते.
७. अ) त्यांच्यामध्ये सावकाराचाही एक मुलगा होतो.
८. अ) फिरत फिरत ते टोळके तिरूवल्लुवरकडे पोहोचले.
९. इ) तुझ्यात हिंमत असेल तर त्याला राग आणून दाखव.
१०. आ) त्याच्या आवाजात किंचितही राग नव्हता.
११. आ) क्रोध, अहंकार यासारखे वाईट गुण माणसाचे जीवन फाडून फाडून टाकतात.
१२. अ) त्याच्या आवाजात चीड नव्हती की संताप नव्हता.
१३, ई) “माणसाने प्राणपणाने सांभाळावी अशी एकच वस्तू देवाने माणसाला दिली आहे.
१४. इ) आपला मुलगा सुधारला म्हणून सावकाराला आनंद झाला.
१५. अ) त्याच्या ओव्या ऐकून सावकार प्रभावित झाला.
१६. आ) त्या ओव्या ऐकून सावकाराला वाटले की, तिरूवल्लुवरच्या ओव्या हा मोठा खजिना आहे.
१७. इ) नव्या म्हणून सावकार तिरूवल्लुवरला घेऊन मदुरा येथे भरलेल्या कविपरिषदेत आला.
१८.अ) एकेका कवीने आपापला काव्यग्रंथ वाचून दाखविला.
१९. आ) खरोखरच हा जीवनाचा महान काव्यग्रंथ आहे.”
२०. ई) त्यांनी ज्या छंदात ओव्या लिहिल्या त्याला तामिळ भाषेत ‘कुरल’ म्हणतात.
२१. इ) तिरूवल्लुवरला जाऊन आज हजारो वर्षे झाली.