प्रश्न

(अ)  पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१.  टॉलस्टॉय कोण होते ?
उत्तर.
  टॉलस्टॉय एक विश्वविख्यात रशियन लेखक होते.

२.  तरुण निराश का झाला ?
उत्तर. 
तरुण निराश झाला होता कारण त्याला सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही नोकरी मिळत नव्हती.

३.  युवक आश्चर्यचकीत का झाला ?
उत्तर
.  टॉलस्टॉयने युवकाला सांगितले कि त्याचे शरीर रुबल्सना विकले तर पैसे मिळणार. हे ऐकून युवक आश्चर्यचकीत झाला.

(ब)  पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.

१.  तरुणाने टॉलस्टॉय यांच्यापाशी कोणती तक्रार केली ?
उत्तर.
  तरुणाने टॉलस्टॉय यांच्यापाशी अशी  तक्रार केली कि तो म्हणाला, “सर्व प्रकारचे प्रयत्न केले. पण नोकरी मिळत नाही. आता मी जाऊ तरी कोठे ? आणि करु तरी काय ? खरचं देव आहे की नही याबद्दल मला संशय वाटत आहे. देव जरी असला तरी त्याने माझ्यावर खूप अन्याय केला आहे. देवाने मला काहीच दिले नाही.

२.  टॉलस्टॉयनी तरुणाच्या अवयवांची किंमत किती केली ?
उत्तर. 
टॉलस्टॉय तरुणाच्या अवयवांची किंमत करत म्हणाले, “तुझी तयारी असेन तर एक हजार रुबल्सना तुझे पाय, पाच हजार तुझे हात दहा हजारात तुझे नाक आणि वीस हजार रुबल्सना तुझे डोळे मी विकून देऊ शकतो. बोल ! कबूल आहे हा सौदा ?”

३.  तरुण परिश्रम का करू लागला ?
उत्तर. 
टॉलस्टॉयने तरुणाला समजावले कि त्याचे पूर्ण शरीर लाखो मुल्याचे आहे. ऐवढे मौल्यवान शरीर परमेश्वराने तुला दिले आहे तरी तू देवाला दोष देतोस ? हे ऐकल्यावर मात्र तरुण्याचा डोळयात लख्ख प्रकाश पडला. हे शरीर केवळ पुष्ट होऊन आराम करण्यासाठी नाही तर परिश्रम करण्यासाठी आहे. निरूद्योगी राहून चालणारा नाही. कष्ट करणाऱ्यालाच नशीब साथ देते. पुढे तो तरुण परिश्रम करुन सुखी झाला.

व्यवसाय :

(अ)  खालील वाक्ये कोणि कोणास म्हटले ते लिहा.

१.  ” सर्व प्रकारचे प्रयत्न केले.”
उत्तर
. तरुणाने टॉलस्टॉयला म्हटले.

२. ” महाशय, आपण काय बोलत आहात ?”
उत्तर.
  तरुणाने टॉलस्टॉयला विचारले.

३.  “अरे, मी तुझे अवयव कापायला नाही  सांगणार.”
उत्तर. 
टॉलस्टॉय तरुणाला म्हणाला.

(ब)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१.  तो _________ होऊन बोलत होता.

२.  बोल! _________ आहे हा सोदा ?

३.  तुम्ही माझी ________ करत आहात.

उत्तर.  (१)  निराश

(२)  कबूल

(३)  थट्टा

भाषाभ्यास

(अ)  पुढील वाक्यांमधील सर्वनामे ओळखून त्यांचे ‘प्रश्नार्थक’ व ‘दर्शक’ असे वर्गीकरण करा.

१  ही आमची बाग
=
  दर्शक सर्वनाम

२.  चिमणे, रडतेस काय ?
=
  प्रश्नार्थक सर्वनाम

३.  कोणी रे मारले तुला बाळ?
=
  प्रश्नार्थक सर्वनाम

४.  कोण आहे रे तिकडे ?
=
  प्रश्नार्थक सर्वनाम

(ब)  लिंगभेदानुसार शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकातील शिकवलेल्या घड्यांतून शोधो व त्याचे वर्गीकरण  करा.

    पुलि  स्त्रीलिंग     नपुंसकलिंग
       समुद्र   वीज           पान
      कावळा   पपई           घर
       दगड   टेकडी            फूल