अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
१) पारिजात पाहून कोणाचा रोष मनी मावळला?
उत्तर – पारिजात पाहून सत्यभामेचा रोष मनी मावळला.
२) कोणता वास रानोमाळ दरवळत आहे ?
उत्तर. केवड्याच्या वास रानोमाळ दरवळत आहे .
३) सुंदर ललना कुठे निघाल्या आहे ?
उत्तर. सुंदर ललना देवदर्शनाला निघाल्या आहे.
(आ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत तिहा :
१) कवीला कोणता भास होत आहे ?
उत्तर. नभी उडणारी बगळ्यांची माळ कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळेप्रमाणे भासते. ग्रहगोलाप्रमाणे ती एकत्र होऊन पृथ्वीवर उतरत असल्याचा कवीला भास होत आहे.
२) हिंदू धर्मात श्रावणमासला विशेष महत्त्व का दिला आहे ?
उत्तर. हिंदू धर्मात श्रावणमासाला विशेष महत्त्व दिला आहे कारण सृष्टिमाता यावेळी विलक्षण प्रसन्न असते. हर्षभरित करणारा व सृष्टिमातेच्या अंगावर हरित तृणांचे हिरवेगार गालिचे पसरविणारा हा महिना महिलांचा खास आहे. अंगावर फुलोरा फुलवणाऱ्या अधून मधून येणार्या पावसाच्या सरी, ऊन-पावसाचा खेळ, चोहिकडे वातावरणात एक नवचैतन्य भरलेलं असतं. असा हा श्रावण महिना मनाला टवटवी आणतो.