अधिक प्रश्न

(अ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१.  जेवणं कधी सुरू होत ?
 उत्तर.  वडील देवळात पूजा करून गणपतीचे तीर्थ आणत. ते सर्वांनी घेतले म्हणजे जेवणं सुरू होत.

२.  आईने कसली भाजी केली होती ?
उत्तर.  आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती.

(ब)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच – सहा वाक्यात लिहा.

१.  आपली मोठी चूक झाली असे आईला का वाटले ?
उत्तर.  आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले कारण जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यायला तो चांगला करून द्यावा. मग ती भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही. हे बरे झाले नाही असे आईला वाटले.