अधिक प्रश्न

(अ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१.  सिंह राजा सर्वांना का आवडायचा ?
उत्तर.  सिंह राजा दयाळू आणि न्यायी असल्यामुळे सर्वांना तो खूप खूप आवडायचा.

२.   नवीन राजा कोण झाला ?
उत्तर.  राज्याची शिस्त धाब्यावर बसवून हत्ती राजा झाला.

३.   हत्तीराजाचा रथ कुठे येत होता ?
उत्तर.   हत्तीराजाचा रथ वाजत गाजत जंगलनगरीत येत होता.

(ब)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन चार वाक्यांत लिहा.

१   हत्ती धावत असताना सर्वांना नवल का वाटले ?
उत्तर‌.  हत्ती खूपच थकत चालला होता. परंतु मुंगी आपल्याबरोबर धावते आहे, याचा त्याला खूप राग आला. आता तर धावता धावता तो मोठमोठ्याने चित्कारु लागला. त्याच्या त्या आवाजामुळे जंगलात एकच कोलाहल माजला. सर्व प्राणी त्या ठिकाणी जमेल. मुंगीबरोबर हत्ती  धावूच शकत नाही, याचे सर्वांना नवल वाटले.

२. जंगलात कसली पळापळ सुरु झाली ?
उत्तर.  सिंहाच्या मरणानंतर सर्वजण दुःखात बुडले होते, पण मग हळूहळू जंगलातील दुःखाची छाया कमी कमी होऊ लागली. दहा पंधरा दिवस असेच गेले आणि नवीन राजाच्या निवडीचे वेध सगळ्यांना लागले. रात्री अपरात्री बैठका गाजू लागल्या. सभासदांची पळापळ सुरु झाली.

३.  हत्तीने मुंग्यांबरोबर कसली शर्यत लावली ?
उत्तर.  मुंगी हत्तीला म्हणाली “महाराज, आम्ही लहान म्हणून आमची हेटाळणी करू नका. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे असाल. सशक्त असाल. परंतु तुम्ही आमच्याइतके पळू शकणार नाही. “हे ऐकल्यावर हत्तीराजा जास्त खवळला, व म्हणाला “क्षुद्र कीटकांनो, तुम्ही माझ्याबरोबर पळू शकाल काय ? माझ्या एका पावलाचे अंतर तोडण्यास तुम्हाला कितीतरी वेळ लागेल.” असे सांगून हत्तीने मुंग्यांबरोबर पळण्याची  शर्यत लावली.

(अ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच – सहा वाक्यांत लिहा.

३.  हत्तीराजा कसा मेला ?
उत्तर. हत्तीराजाने मुंगीशी पळण्याची शर्यत लावली. शर्यत सुरू झाली होती. हत्ती रागेरागे धावत होता. त्याचा पायातून कळा येऊ लागल्या. परंतु पळताना आपल्याबरोबर मुंगी पळत असल्याचे पाहून तो तसाच पळू लागला. त्याच्या डोक्याला व अंगाला दरदरून घाम आला. डोक्याचा घाम डोळ्यांत जाऊन हत्तीला समोरचे काहीच दिसेनासे झाले. पळता पळता हत्तीराजा खड्ड्यात पडून मेला.