(अ) खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात लिहा.
१. कोल्हा कुठून जात होता ?
उत्तर. कोल्हा ओढ्याच्या काठाने सावकाश जात होता.
२. काळा खेकडा काय करत होता ?
उत्तर. भलामोठा काळा खेकडा गवताची पाती कुरतडत होता.
३. कोल्ह्यानं खेकड्याचा नाद का सोडला ?
उत्तर. चिखल उडत होता. तसं करून खेकडा मिळणं कठीण होतं म्हणून कोल्ह्यानं खेकड्याचा नाद सोडला.
४. खेकड्यानं आपली चाल का थांबवली ?
उत्तर. कोल्हा नजीक जाताच खेकड्यानं आपली चाल थांबवली.
५.कोल्ह्याला कसली खात्री होती?
उत्तर. बिळात खेकडा आहे याची खात्री कोल्ह्याला होती.
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.
१. कल्पनेत गुंग झालेल्या कोल्ह्याची अवस्था काय झाली ?
उत्तर. कल्पनेत गुंग झालेल्या कोल्ह्याच्या मस्तकात अचानक एक असघ्य कळ घुसली. काय होतं हे कळायच्या आत कोल्हा झोपावला. वाट दिसेल तिकडं पळत सुटला. शेपटीला अडकलेल्या ओझ्याची जाणीव त्याला होत होती. त्या चिखलातून पळून कोल्हा दमला. त्याला वेग मंदावला. त्यानं मागे वळून पाहिले तर शेपटीला खेकडा चिकटला होता.
२. कोल्ह्याला कोणती वेदना सोसणं कठीण होत होतं ?
उत्तर. शेपटीला खेकडा चिकटलेला पाहून कोल्हा खेकडा पकडण्यासाठी वळला. गरकन स्वतःभोवणी फिरला. पण तो खेकडा तोंडात आला नाही. खेकड्याची शेपटीची पकड बळकट होत होती, असह्य वेदना उठत होती. ती वेदना सोसणं कठीण होत होतं.
३. कोल्ह्याच्या डोळ्यांत सुख कसे उतरले ?
उत्तर. कोल्ह्यानं आपल्या पंजाने खेकड्याला उडवलं. गवतावर खेकडा उताणा पडलेला त्याला दिसला. क्षणभर त्याचं पांढरं पोट नजरेत आलं. त्याच क्षणी कोल्ह्यानं आपला जबडा त्यावर आवळला. तोंडात खेकडा आला होता. आवळल्या जाणाऱ्या दातांबरोबर कोल्ह्याच्या डोळ्यांत सूख उतरत होतं.